शेततळ्यात पाय घसरून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:00 IST2019-11-30T14:00:39+5:302019-11-30T14:00:46+5:30
येवला : तालुक्यातील गारखेडा येथील कौठखेडा शिवारातील तरु ण शेतकºयाचा शेततळ्यात पाय घसररून पडल्याने बुडून मृत्यू झाला.

शेततळ्यात पाय घसरून शेतकऱ्याचा मृत्यू
येवला : तालुक्यातील गारखेडा येथील कौठखेडा शिवारातील तरु ण शेतकºयाचा शेततळ्यात पाय घसररून पडल्याने बुडून मृत्यू झाला. कौठखेडा शिवारातील तरु ण शेतकरी प्रदीप प्रकाश मगर (२८) कांदा लागवड करण्यासाठी शुक्र वारी दुपारी एक वाजता गारखेडा येथील दिपक सिताराम मगर यांच्या शेतातील शेततळ्यात पाईप टाकण्यासाठी गेला होता. अचानक पाय घसरून प्रदीप मगर पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. तळ्यात पडलेल्या तरु णाला कोपरगाव येथील खासगी शोध पथकाने बाहेर काढले. मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला असून दरम्यान घटनेमुळे गारखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.