भाटगाव विविध कार्यकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल
By Admin | Updated: April 12, 2016 00:29 IST2016-04-11T23:06:34+5:302016-04-12T00:29:51+5:30
भाटगाव विविध कार्यकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल

भाटगाव विविध कार्यकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल
येवला : भाटगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वसंत पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने संपूर्ण १३ जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे.
शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट- भानुदास बाबूराव चव्हाण, पोपट वामन गायकवाड, उइम नाना घुले, ज्ञानेश्वर रतन जाधव, चंपालाल सुंदरलाल कहार, जयराम परशराम पवार, माधवराव कारभारी पवार, राहुल भाऊसाहेब रक्ताटे, महिला राखीव गट- दोन जागेवर मीना सूर्यभान गुंजाळ, हौशाबाई देवचंद कोल्हे, अनुसूचित जाती-जमाती गट- विश्वनाथ दगू जगताप, तर इतर मागासवर्गीय गटातून एका जागेसाठी पॅनलचे नेते वसंत उत्तमराव पवार, विमुक्त जाती-भटके जमाती, विशेष मागास प्रवर्ग गट- नानासाहेब किसन ठोंबरे आदिंचा समावेश आहे. शेतकरी विकास पॅनलचे नानासाहेब चव्हाण, बाळनाथ खुळे, भास्कर वैद्य, बाळासाहेब खोडके, शंकरराव होन, सोपान कोकाटे, सुखदेव चव्हाण, तुलशीराम जाधव, गोरख दळेकर, बाळासाहेब ठाकरे यांनी विजयासाठी विशेष परिश्रम घेतले.
पारदर्शी कारभार, सोसायटीच्या नफ्यातून इमारत उभी करून कायमस्वरूपी उत्पन्नाचा श्रोत उभा करून, विकासकामांना प्राधान्य दिल्याने सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला, अशी प्रतिक्रि या पॅनलचे नेते वसंतराव पवार, आणि माधवराव पवार यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)