उमराळे सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल

By Admin | Updated: July 14, 2016 00:21 IST2016-07-14T00:02:06+5:302016-07-14T00:21:21+5:30

निवडणूक शांततेत : १३ जागांवर निर्विवाद विजय मिळवत सत्ता कायम

Farmer Development Panel on Umerale Society | उमराळे सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल

उमराळे सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल

दिंडोरी : तालुक्यातील राजकीयदष्टया संवेदनशील असणाऱ्या उमराळे बुद्रूक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कादवा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जे. डी. केदार, सोसायटीचे अध्यक्ष, डॉ, पुंडलिक धात्रक, रामदास, धात्रक, माजी उपसरपंच संजय केदार, मदन
केदार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या
सर्व १३ जागांवर निर्विवाद विजय मिळवत सत्ता कायम राखली.
शेतकरी विकास पॅलनचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण कर्जदार गटातून हिरामण भाऊ कडाळी (२४६), पांडुरंग शंकर केदार (२९३), मदन बाबूराव केदार (२५९), रामचंद्र महादू केदार (२७३), सचिन जगन्नाथ केदार (२६९), तानाजी वाळू धात्रक (२६२), रामदास शिवराम धात्रक (२७७), कचू तुकाराम सोनवणे (२४९) व इतर मागास प्रवर्गातील
एका जागेवर वसंत बाबूराव थेटे (२८९), महिला राखीव गटातून लताबाई संजय केदार (२६७), विठाबाई विश्वनाथ गामणे (२५८), भटक्या जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातील एका जागेवर डॉ. पुंडलिक भीमाजी धात्रक (२७१), अनूसूचित जाती/जमाती गटातून काशीनाथ आबाजी पगारे (२६६) हे उमेदवार विजयी झाले.
जय जवान जय किसान पॅनलचे पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे- हरिदास संतू सोनवणे (२०२), बळवंत यशवंत थेटे (१८४), बाळासाहेब दामोधर केदार (१९५), शिवाजी तुकाराम धात्रक (१९७), राजाराम मुरलीधर थेटे (१६६), दिलीप मोहन पगारे (१७३), कैलास दामोदर केदार (१७३), शशिकांत नामदेव
गामणे (२०५), महिला राखीव- सीताबाई भास्कर सोनवणे (२२४), सुशीला शांताराम पाटील,
इतर मागास प्रवर्ग- विष्णू पंढरीनाथ थेटे (१८८), अनुसूिचत जमाती-
वसंत पंढरीनाथ भोये (२०६), भटक्या विमुक्त जाती/जमाती- आदिकराव केदार (२१०) निवडणुकीचा
निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालांची उधळण करत
आनंदोत्सव साजरा केला. निवडणूकप्रक्रिया शांततेत पार
पडली. (वार्ताहर)

Web Title: Farmer Development Panel on Umerale Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.