ओझर परिसरातील शेतीचे नुकसान

By Admin | Updated: August 5, 2016 00:37 IST2016-08-05T00:36:56+5:302016-08-05T00:37:08+5:30

ओझर परिसरातील शेतीचे नुकसान

Farm losses in Ojhar area | ओझर परिसरातील शेतीचे नुकसान

ओझर परिसरातील शेतीचे नुकसान

ओझर परिसरातील शेतीचे नुकसानओझर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बाणगंगा नदीला पूर आल्याने नागरिकांचे ेप्रचंड नुकसान झाले. पावसाने बुधवारी थोडीफार विश्रांती घेतली. पूर ओसरत गेला तसे नुकसानीचे चित्र स्पष्ट होत गेले आणि खरी परिस्थिती समोर आली.
ओझरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुरात वाहून गेल्याने ओझरकरांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यंत्रणा कामाला लागली आहे.
चांदोरी परिसरात तर अजून पूर ओसरत असून मोबाइल सेवा ठप्प होती. पोलिसांनी पुढील धोका लक्षात घेऊन सायरन वाजवत लोकांचे स्थलांतर केले. तेथे गुरुवारी आमदार अनिल कदम यांनी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन पुराचा दौरा केला असून संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
ओझर येथे पुलाजवळ असलेल्या वस्तीत प्रचंड गाळ साचला आहे. आणि कचऱ्याचे ढीग उपसण्याचे काम सुरू आहे.
येथील दुर्योधन कुरेराव व सागर पवार यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. जेसीबीच्या साहाय्याने गाळ, चिखल काढला जात आहे. अनिल सोमासे यांचे शेतीत तर संपूर्ण कचऱ्याचा ढीग आहे. अनुसया पार्क येथे छातीएवढे पाणी शिरले होते. तिन्ही पुलांमध्ये कचरा अडकून कठडे वाहून गेल्याने पूल धोकादायक बनले आहे. बीएसएनएलची मुख्य केबल तुटल्याने येथील ब्रॉड बँड सेवा पूर्ण ठप्प आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सेवा पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जुन्या सायखेडा रस्त्यावरची डीपी पाण्याखाली गेल्याने लोकांची रात्र अंधारात गेली. पूर ओसरल्यानंतर वीजप्रवाह पूर्ववत करण्यात आला.
पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून ग्रामस्थांना वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम केले. प्रचंड मोठा पूर येऊनही पोलीस आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्परता दाखविल्यामुळे मोठी हानी झाली नाही. गावातील पाणीपुरवठा सुरू व्हायला काही दिवसांचा अवधी लागेल. (वार्ताहर)

Web Title: Farm losses in Ojhar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.