शेतीचे नुकसान
By Admin | Updated: September 17, 2016 22:41 IST2016-09-17T22:41:05+5:302016-09-17T22:41:22+5:30
शेतीचे नुकसान

शेतीचे नुकसान
पेठ : येथे जवळपास एक एकर टमाटा शेतीची अज्ञात समाजकंटकांनी नासधूस केली असून, याबाबत पेठ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोहोर येथील शहानवाज शेख या शेतकऱ्याने टमाट्याचे रोप लावले होते. जेमतेम पीक जोम धरू लागले असतानाच रात्रीच्या वेळी अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या शेतातील पाचशेच्या वर झाडे उपटून
फेकून दिली. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पेठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कोहोरचे तलाठी भालेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. (वार्ताहर)
वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.