दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची फरांदे यांची मागणी : अवैध गर्भपात प्रकरण
By Admin | Updated: April 3, 2017 18:14 IST2017-04-03T15:33:28+5:302017-04-03T18:14:40+5:30
आमदार देवयानी फरांदे यांनी आज जिल्हा शासकिय रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत चर्चा केली. गर्भपातप्रकरणी दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर बडतर्फची कारवाई करण्याची मागणी

दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची फरांदे यांची मागणी : अवैध गर्भपात प्रकरण
नाशिक : येथील जिल्हा शासकिय रुग्णालयात अवैधरित्या २६ आठवड्यांची गर्भवती असलेल्या महिलेचा गर्भपात केल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी आज जिल्हा शासकिय रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत चर्चा केली. गर्भपातप्रकरणी दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर बडतर्फची कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी बोलताना केली. त्याचप्रमाणे गर्भपातप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या डॉ. लहाडे यांच्या खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रियांची माहिती घेण्याचे आदेश फरांदे यांनी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय देकाटे यांना दिले आहे.