मालेगावी श्रींना भावपूर्ण वातावरणात निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:26+5:302021-09-21T04:16:26+5:30
गणेश विसर्जन कुंडनिहाय विसर्जित झालेल्या मूर्तींची आकडेवारी अशी - मालेगाव कॅम्प - ५८ महादेव घाट गणेश कुंड - ८८ ...

मालेगावी श्रींना भावपूर्ण वातावरणात निरोप
गणेश विसर्जन कुंडनिहाय विसर्जित झालेल्या मूर्तींची आकडेवारी अशी -
मालेगाव कॅम्प - ५८
महादेव घाट गणेश कुंड - ८८
वाल्मीकनगर शाळा - १२०
सोयगाव अग्निशमन दल केंद्र - १०४
अंबिका कॉलनी - ९८
गोळीबार मैदान - १६५
संभाजीनगर - २४३
पुुष्पाताई हिरे नगर - ६४
भायगाव गावठाण नदी - २४५
कलेक्टरपट्टा - २१८
द्याने फरशी पूल - ४४५
शिवाजी जिमखाना - २३१
टेहरे चौफुली गिरणा नदीपात्र - २५००
-------------------------
गणेश कुंडाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन
शहरालगतच्या टेहरे चौफुलीजवळील गिरणा नदीपात्रात महापालिकेने स्वतंत्र गणेश कुंड उभारावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ताराचंद बच्छाव व गणेश भक्तांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांना काही काळ ताब्यात घेतले होते. महापालिकेचे उपायुक्त राहुल पाटील यांनी गणेश कुंड उभारण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून गणेश कुंड उभारणीची मागणी केली जात आहे. महापालिका प्रशासन दखल घेत नसल्यामुळे गणेश भक्तांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. या आंदोलनात गणेश भक्त सहभागी झाले होते.
---------------------
मालेगावी टेहेरे चौफुली गिरणा नदी या ठिकाणी ताराचंद बच्छाव हे सोयगाव येथे गणेश कुंड उभारणे कामी आंदोलन करीत होते. त्यावेळेस मनपाचे उपायुक्त राहुल पाटील यांनी महानगर पालिकेतर्फे आश्वासनाचे पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
(२० मालेगाव आंदोलन१) (२० मालेगाव गणेश २)
200921\20nsk_42_20092021_13.jpg~200921\20nsk_43_20092021_13.jpg
२० मालेगाव आंदोलन१~२० मालेगाव गणेश २