१७ कोरोनामुक्तांवर पुष्पवृष्टी करीत रुग्णालयातून निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:30+5:302021-05-08T04:13:30+5:30

रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह त्यांच्या स्टाफने पहिल्या माळ्यावरील गॅलरीत उभे राहून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांवर पुष्पवृष्टी करीत त्यांना ...

Farewell to the hospital by showering flowers on 17 Coronamuktas | १७ कोरोनामुक्तांवर पुष्पवृष्टी करीत रुग्णालयातून निरोप

१७ कोरोनामुक्तांवर पुष्पवृष्टी करीत रुग्णालयातून निरोप

रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह त्यांच्या स्टाफने पहिल्या माळ्यावरील गॅलरीत उभे राहून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांवर पुष्पवृष्टी करीत त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप दिला. या अनोख्या वातावरणाने रुग्णही भावुक झाले. महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणारे डाॅक्टर, कर्मचारी यांच्यामुळेच कोरोनात बरे होऊन जीवदान लाभल्याने समाधान व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

बुधवारी मोतीराम खोड, बबाबाई काकड, उत्तम गीते, रखमाबाई गुंजाळ, मनीषा शिंदे, राजेंद्र शिंदे, राधा परदेशी, दिलीप पवार, ज्ञानेश्वर मोरे, नामदेव क्षीरसागर, इंदुबाई ठोक, चंद्रसेन क्षीरसागर, संतोष सोनवणे, नंदा गवळी, सुनीता आसळक, एकनाथ शिरसाठ, कमल घुगे या १७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण रुग्णालयात उपचाराअंती बऱ्या झालेल्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णांवर पुष्पवृष्टी करीत त्यांचे अभिनंदन केल्याने घरी परतणाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. तर रुग्णालयातील कर्मचारी वर्गाच्या जागरूक आणि तत्पर सेवेचे तोंड भरून कौतुक केले.

फोटो ओळी - ०७ सिन्नर कोरोना

सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या कोरोनामुक्त रुग्णांवर पुष्पवृष्टी करीत त्यांना निरोप देताना रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे व कर्मचारी.

===Photopath===

070521\07nsk_8_07052021_13.jpg

===Caption===

सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या कोरोनामुक्त रुग्णांवर पुष्पवृष्टी करीत त्यांना निरोप देताना रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे व कर्मचारी.

Web Title: Farewell to the hospital by showering flowers on 17 Coronamuktas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.