टाळ-मृदुंगाच्या गजरात गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:49+5:302021-09-21T04:15:49+5:30
गावातील भजनी मंडळी गणेशोत्सव काळात अकराही दिवस प्रत्येक घरगुती व मंडळाच्या गणपतीसमोर वारकरी भजन करून हरिनामाचा जागर करतात. प्रत्येक ...

टाळ-मृदुंगाच्या गजरात गणरायाला निरोप
गावातील भजनी मंडळी गणेशोत्सव काळात अकराही दिवस प्रत्येक घरगुती व मंडळाच्या गणपतीसमोर वारकरी भजन करून हरिनामाचा जागर करतात. प्रत्येक गणपतीसमोर भजन ठरलेले असते. मध्यरात्रीपर्यंत रोज भजनाचे कार्यक्रम होतात. भजनी मंडळींमध्ये शांताराम काळे, जगन्नाथ काळे, सुरेश काळे, रंगनाथ काळे, हौशीराम काळे, नामदेव काळे, चेतन शिंदे, बाळू माळी, दशरथ काळे, मधुकर बेंडकोळी, ज्ञानेश्वर डगळे, संजय कदम आदी भजनी मंडळींनी सहभाग घेतला. यात तरुण पिढीनेदेखील सहभाग नोंदविला.
------------
पिंपळगाव मोर येथे भजनी मंडळाच्या वतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात गणरायाला निरोप देताना भजनी मंडळ. (२० पिंपळगाव मोर)
200921\20nsk_9_20092021_13.jpg
२० पिंपळगाव मोर