दिंडोरी नगर पंचायत सदस्यांना समारंभपूर्वक निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 05:35 PM2021-01-31T17:35:56+5:302021-01-31T17:37:03+5:30

दिंडोरी : नगर पंचायत दिंडोरी येथे नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने, नगर पंचायत सभागृहात मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या संकल्पनेनुसार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Farewell to Dindori Nagar Panchayat members | दिंडोरी नगर पंचायत सदस्यांना समारंभपूर्वक निरोप

दिंडोरी नगर पंचायत सदस्यांच्या निरोप समारंभप्रसंगी रचना जाधव, कैलास मवाळ, नागेश येवले आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देमाझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वांना हरित कायदा पालनाची शपथ

दिंडोरी : नगर पंचायत दिंडोरी येथे नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने, नगर पंचायत सभागृहात मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या संकल्पनेनुसार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यास नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ तसेच नगरसेवक तुषार वाघमारे नगर पंचायतचे प्रशांत पोतदार, धीरज भामरे आदींनी मनोगत व्यक्त केले. मुख्याधिकारी येवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना झपाट्याने वाढत असलेल्या दिंडोरी शहरात विकासासाठी भरपूर वाव असून, शहराच्या विकासात सर्व सदस्यांनी आपले योगदान देऊन भविष्याच्या दृष्टीने एक आश्वासक पायाभरणी नगर पंचायतच्या पहिल्या पंचवार्षिक काळात झाल्याचे सांगितले.
माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वांना हरित कायदा पालनाची शपथ देऊन प्रत्येक सदस्याने आजच्या दिवसाची आठवण म्हणून एक झाड लावण्याचे मान्य केले. यावेळी नगरसेवक भाऊसाहेब बोरस्ते, प्रमोद देशमुख, सचिन देशमुख, संतोष गांगोडे, धनराज भवर, मालती जाधव, आशा कराटे, सविता देशमुख, विमल जाधव, रत्ना बोरस्ते, निर्मला जाधव, रोहिणी पगारे, रंजना चारोस्कर, शैला उफाडे व स्वीकृत नगरसेवक माधवराव साळुंखे, नीलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
 

Web Title: Farewell to Dindori Nagar Panchayat members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.