एक कुटुंब, एक झाड; थेटाळे येथे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST2021-07-05T04:10:25+5:302021-07-05T04:10:25+5:30

प्रत्येक कुटुंबाला एक फळझाड देणे व त्यांनी त्याची जोपासना करणे. तसेच गावात फळझाडांची संख्या वाढवणे व लोकांमध्ये झाडे लावण्याची ...

A family, a tree; Activities at Thetale | एक कुटुंब, एक झाड; थेटाळे येथे उपक्रम

एक कुटुंब, एक झाड; थेटाळे येथे उपक्रम

प्रत्येक कुटुंबाला एक फळझाड देणे व त्यांनी त्याची जोपासना करणे. तसेच गावात फळझाडांची संख्या वाढवणे व लोकांमध्ये झाडे लावण्याची गोडी वाढविणे हा उदात्त हेतू ठेवून या वर्षी थेटाळे येथील प्रत्येक कुटुंबाला एक झाड या प्रमाणे तैवान, पिंक, पेरूच्या झाडांचे थेटाळे येथे दत्तात्रय शिंदे यांच्या मळ्यात वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी झाडे वाटपासाठी जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप, सभापती सुवर्णा जगताप, पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुराशे, टाकळी (विंचुर) ग्रामपंचायत सदस्य हरीश गवळी पाटील, ज्योती सुराशे, भाजप महिला सदस्य ज्योती शिंदे यांच्या हस्ते झाडेवाटप करण्यात आले.

या वेळी थेटाळे येथील वनसगाव ग्रुप सोसायटी चेअरमन सतीश शिंदे, भाजप तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे, बाळकृप्ण पवार, केदू शिंदे, माजी चेअरमन लक्ष्मण शिंदे, ह.भ.प. कल्याणी निकम, आशा वर्कर प्रमिला शिंदे आदी उपस्थित होते.

040721\img-20210704-wa0024.jpg

थेटाळे येथे एक कुटुंब एक वृक्ष कार्यक्रमात मान्यवर

Web Title: A family, a tree; Activities at Thetale