कुटुंब रंगले ‘अंताक्षरी’त

By Admin | Updated: June 27, 2014 00:12 IST2014-06-26T21:18:15+5:302014-06-27T00:12:06+5:30

कुटुंब रंगले ‘अंताक्षरी’त

Family played 'Antakshari' | कुटुंब रंगले ‘अंताक्षरी’त

कुटुंब रंगले ‘अंताक्षरी’त

 

नाशिक : धून ओळखून गाणे ओळखणे, गाण्याच्या शेवटी आलेल्या अक्षरावरून गाणे म्हणणे यांसह विविध फेऱ्यांतून रंगत गेलेल्या अंताक्षरीतून माता-पित्यांसह चिमुकल्यांचे चांगलेच मनोरंजन झाले.
निमित्त होते, ‘लोकमत टाइम्स’ कॅम्पस क्लब आणि इझी डे मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मम्मी-पप्पा आणि मी’ या अंताक्षरी कार्यक्रमाचे. इझी डे मार्केटमध्ये झालेल्या सदरील अंताक्षरी कार्यक्रमासाठी कॅम्पस क्लब कुटुंबांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी श्रद्धा मॉलचे सुरेशअण्णा पाटील, डॉ. अक्षय पाटील, इझी डे मॉलचे किरण पडोल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निवड फेरीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कुटुंबाला वादकाने वाजविलेली धून ओळखायची होती आणि ती गाऊन दाखवायची होती. यासाठी प्रत्येक कुटुंबाला तीन धून वाजवून दाखविण्यात आल्या. यातून निवड झालेल्या पाच कुटुंबांची निवड दुसऱ्या फेरीसाठी करण्यात आली. या फेरीमध्ये गाण्याच्या भेंड्या खेळविण्यात आल्या. तिसऱ्या फेरीमध्ये स्क्रीनवर चित्रफीत दाखविल्यानंतर ते गाणं व चित्रपट ओळखून ते गायचे होते. यातही सहभागी स्पर्धकांनी धमाल केली.
चौथ्या व अंतिम फेरीमध्ये प्रत्येक स्पर्धक कुटुंबाला चिठ्ठी देण्यात येऊन त्यात निर्देश दिलेल्या चित्रपटाचे नाव अभिनय करून दुसऱ्याने ओळखायचे होते आणि त्यावर आधारित गाणे म्हणायचे होते. चारही फेऱ्यांवर आधारित गुणातून विजेत्यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी अमोल पालेकर यांनी संगीत संयोजन केले. त्यांना अनिल धुमाळ, स्वरांजय धुमाळ यांनी साथ दिली. कार्यक्रमासाठी श्रद्धा मॉलचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Family played 'Antakshari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.