शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

रिंगणातरणभूमीवर उतरली घराणेशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:57 IST

धनंजय वाखारे । लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राजकारणात घराणेशाही किती खोलवर रुजलेली आहे, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात विधानसभा ...

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : आजी-माजी आमदारांच्या कन्या-सुपुत्र

धनंजय वाखारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राजकारणात घराणेशाही किती खोलवर रुजलेली आहे, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांपैकी एकमेव मालेगाव बाह्य मतदारसंघ वगळता अन्य १४ मतदारसंघांत आजी-माजी आमदारांच्या कन्या-सुपुत्र आणि नातेवाइकांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यात काही विद्यमान आमदार आहेत, तर काही विधानसभेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत.जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना राष्टÑवादीने तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली आहे. पंकज भुजबळ यांनी यापूर्वी दोनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. चांदवड मतदारसंघात माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना भाजपने दुसऱ्यांचा उमेदवारी दिली आहे. दिंडोरी मतदारसंघात जनता दलाचे माजी आमदार व खासदार हरिभाऊ महाले यांचे सुपुत्र व माजी आमदार धनराज महाले यांना शिवसेनेने पुन्हा एकदा रिंगणात उतरविले आहे.देवळाली मतदारसंघात माजी मंत्री बबनराव घोलप यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार योगेश घोलप यांच्यावर शिवसेनेने दुसºयांदा विश्वास टाकला आहे. याच मतदारसंघात माजी आमदार बाबुलाल अहिरे यांच्या कन्या व भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनी बंडखोरी करत राष्टÑवादीकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. नाशिक पश्चिममधून माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे सुपुत्र व माजी आमदार अपूर्व हिरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कळवण मतदारसंघात माजी मंत्री ए. टी. पवार यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांना राष्टÑवादीने उमेदवारी बहाल केली आहे. इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून बंडखोरी करत शिवसेनेत दाखल झालेल्या निर्मला गावित या तिसºयांदा नशीब आजमावणार आहेत. त्या माजी खासदार व आमदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. मालेगाव मतदारसंघात माजी आमदार रशीद शेख यांचे सुपुत्र व कॉँग्रेसचे विद्यमान आमदार असिफ शेख पुन्हा एकदा कॉँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत. निफाड मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम आणि मंदाकिनी कदम यांचे सुपुत्र यतिन कदम हे अपक्ष उमेदवारी करत नशीब आजमावत आहेत. नाशिक पूर्वमध्ये मनसेचे माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र राहुल ढिकले यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पूर्ण तयारी केली आहे.

नातेवाइकांचाही भरणा१९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत कॉँग्रेसकडून विजयी झालेले शंकर वाजे यांचे ते नातू तर माजी आमदार रुक्मिणी वाजे या त्यांच्या चुलती आहेत. नाशिक मध्यमधून भाजपकडून उमेदवारी करणाºया आमदार देवयानी फरांदे या माजी आमदार ना. स. फरांदे यांच्या चुलत सून आहेत, तर बागलाण मतदारसंघातून राष्टÑवादीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाण या माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019