मालेगाव : टोकियो (जपान) येथे होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेसाठी ‘गेल रफ्तार’ या अखिल भारतीय धावपटू निवड चाचणी स्पर्धेत येथील आदिनाथ इंग्लिश मीडिअमची विद्यार्थिनी साक्षी जोहरे हिने १०० व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे.मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. या स्पर्धेत नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, मुंबई येथील दोन हजारांपेक्षा अधिक धावपटू सहभागी झाले होते. साक्षी ही बालेवाडी (पुणे) येथे ५ ते ७ फेब्रुवारी रोजी होणाºया राष्टÑीय अॅथलेटिक्सच्या अंतिम निवड चाचणीसाठी पात्र ठरली आहे.
आॅलिम्पिक स्पर्धेतील निवड चाचणीत जोहरेचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:53 IST