शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:30 IST2017-09-26T23:17:32+5:302017-09-27T00:30:25+5:30

केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार झोपेचे सोंग घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा करत आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एनपीएत टाकून त्यांना सवलती देत आहेत. मात्र शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास पैसे नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे सरकार विसरले आहे.

 False questions of farmers | शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा

शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा

निफाड : केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार झोपेचे सोंग घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा करत आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एनपीएत टाकून त्यांना सवलती देत आहेत. मात्र शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास पैसे नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे सरकार विसरले आहे.
शेतकºयांच्या प्रश्नाबाबत सरकार झोपेचे सोंग घेत आहे. सरकारची झोप उडविण्यासाठी देशातील शेतकरी संघटना सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे २७ सप्टेंबरला हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या २७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थित निफाड तालुक्यातील कोठुरे येथे सायंकाळी ६वा हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन केले आहे.  या मेळाव्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकºयांच्या बैठका आयोजित केल्याचे यावेळी हंसराज वडघुले यांनी सांगितले. ते म्हणाले, सरकार तोड-फोडीचे राजकारण करत आहे. तूर खरेदीत शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. कांदा खरेदीतही व्यापाºयावर दबाव आणत आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पाचशे ते सहाशेनी घसरले आहेत.  निफाड व रानवड कारखान्याचे कर्ज माफ करून ते पुन्हा सुरू झाले पाहिजे, शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकºयांची सक्तीची कर्ज वसुली थांबविली पाहिजे या व इतरही अनेक मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी व त्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यासाठी हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन केले असल्याने मेळावा यशस्वी करण्याचे आवाहनही वडघुले यांनी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोराडे, युवा निफाड तालुकाध्यक्ष नितीन कोरडे, सोमनाथ मोरे, सुधाकर मोगल उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील व राज्यातील सरकार हे उद्योगपतींचे आहे. अंबानी व अदानीसारख्या उद्योगपतींना कोट्यवधी रु पये माफ करून त्यांचे वसूल पात्र कर्ज एनपीएमध्ये टाकून त्यांना सवलत देत आहेत. शेतकºयांना उद्ध्वस्त करून समृद्धी महामार्गाचा घाट घातला जात आहे. शेतकºयांचे संघटन मोडीत काढण्यासाठी त्याच्यावर लोकशाही मार्गाने आंदोलन करताना खोटे गुन्हे दाखल करत आहेत.

Web Title:  False questions of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.