शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा उगलडा : प्रेयसीला ‘डिनर’ दिल्यानंतर प्रियकराने केला खून; मृतदेह गोणीत भरून फेकला बंधा-याच्या पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:11 IST

२७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगण शिवारात बंधाºयाच्या पाण्याच्या पात्रात एका गोणीमध्ये अनोळखी युवतीचे प्रेत आढळले होते. या प्रेताचा चेहरा अत्यंत विद्रुप करण्यात आला होता, जेणेकरून तिची ओळख पटू नये. तसेच संशयित बाजीराव सांगळे (रा.मखमलाबाद) याने त्याच्या मित्राच्या मदतीने हात-पाय बांधून प्रेत गोणीत भरले होते व त्यावर दगडही भरून पाण्यात फेकून दिले होते.

ठळक मुद्देदीड महिन्यांपासून सोनाली घरातून काहीही न सांगता निघून गेली पोलिसांनी मृतदेहाचे कपडे, अन्य वस्तू दाखविले असता कुटुंबीयांनी ते ओळखले मुलीच्या पँटवर असलेल्या बेल्टचे बक्कलचा सुराग

नाशिक : गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा केला तरी तो फारसा लपून राहत नाही. गुन्हा करताना केलेला बनाव आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात गुन्हेगार एक तरी लहानसा ‘सुराग’ सोडून जातो आणि त्याआधारे पोलीस त्यास बेड्या ठोकतात,असे विविध चित्रपटामधून पहावयास मिळते. असाच एका गुन्ह्याचा सुराग ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाला. पोलिसांनी आंबेगण शिवारातील बंधाºयात आढळलेल्या युवतीच्या मृतदेहाची ओळख पटवून मुख्य संशयित आरोपी मयत मुलीच्या प्रियकर संशयित बाजीराव सांगळे यास बेड्या ठोकल्या.याबाबत अधिक माहिती अशी, २७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगण शिवारात बंधा-याच्या पाण्याच्या पात्रात एका गोणीमध्ये अनोळखी युवतीचे प्रेत आढळले होते. या प्रेताचा चेहरा अत्यंत विद्रुप करण्यात आला होता, जेणेकरून तिची ओळख पटू नये. तसेच संशयित बाजीराव सांगळे (रा.मखमलाबाद) याने त्याच्या मित्राच्या मदतीने हात-पाय बांधून प्रेत गोणीत भरले होते व त्यावर दगडही भरून पाण्यात फेकून दिले होते. प्रेत पाण्यात तरंगू नये, याची खबरदारीदेखील संशयित आरोपीने घेतली होती. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा तपास ग्रामीण गुन्हे शाखेला सोपविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक नितीन पाटील, दत्ता हांडगे, चेतन मोरे, राजेश काकड, प्रशांत काकड आदींनी घटनास्थळ पिंजून काढले.असा लागला सुगावामृतदेहाचे निरीक्षण करत मुलीच्या पँटवर असलेल्या बेल्टचे बक्कल पोलिसांनी बारकाईने निरीक्षण करत त्यावरील शिक्का व शैक्षणिक संस्थेचे बोधचिन्ह ओळखून शहरासह जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये तपास सुरू केला. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता मुलींची माहिती मिळविली. यावेळी मखमलाबादमधील एक मुलगी दीड ते दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार पोलिसांनी गंगानाथ कपिलेश्वर झा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या बेपत्ता मुलीबाबत चौकशी केली. यावेळी कुटुंबीयांनी असल्याचे सांगितले. ती विवाहित असल्यामुळे बहुतेक सासरी गेली असावी, असा कयास कुटुंबीयांनी बांधल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मृतदेहाचे कपडे, अन्य वस्तू दाखविले असता कुटुंबीयांनी ते ओळखले व मृतदेह सोनालीचा असल्याची खात्री पटली.

टॅग्स :NashikनाशिकMurderखूनPoliceपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय