फुगे फोडण्याच्या नकली बंदुकीने धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:02 IST2017-08-05T01:02:28+5:302017-08-05T01:02:47+5:30
टाकळी येथील आश्रमशाळेत जात फुगे फोडण्याच्या नकली बंदुकीचा धाक दाखवणाºया नारायण कचरू ठाकरे (रा. टाकळी बु.) यास नांदगाव पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध अदखलपात्रतेचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राजेश जगन्नाथ हिरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

फुगे फोडण्याच्या नकली बंदुकीने धमकी
नांदगाव : तालुक्यातील टाकळी येथील आश्रमशाळेत जात फुगे फोडण्याच्या नकली बंदुकीचा धाक दाखवणाºया नारायण कचरू ठाकरे (रा. टाकळी बु.) यास नांदगाव पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध अदखलपात्रतेचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राजेश जगन्नाथ हिरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
बंदूक आकाराने लहान असून तिच्यात छरे भरून ती वापरतात. जवळून छरा उडवला तर जखम होऊ शकते. मात्र ठाकरेचा यामागे कोणता उद्देश होता याची चौकशी पोलीस करत आहेत. आज दुपारी ही घटना घडली. टाकळी ग्रामस्थांनी बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाºया ठाकरेला पकडून नांदगाव पोलीस स्टेशनला आणले. पण येथे आल्यानंतर अचानक हिसका देऊन त्याने पळ काढला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पळापळ झाली. पाठलाग करून पोलिसांनी त्याला नदीकाठावर पकडले. पुढील तपास पोलीस नाईक रमेश पवार करत आहेत.