इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: October 24, 2014 01:03 IST2014-10-24T00:53:54+5:302014-10-24T01:03:09+5:30
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
नाशिक : बांधकाम सुरू असताना पाचव्या मजल्यावरून खाली पडलेल्या बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली़
भाऊसाहेब दामोदर सुरूडकर (३२), रा़ नांदूरनाका, औरंगाबादरोड असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे़ यबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरूडकर हा नांदुरनाका परिसरातील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करत होता़ मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अचानक त्याचा तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून तो खाली पडून गंभीर जखमी झाला़ त्यास खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)