उपनगरमधून बनावट खवा जप्त
By Admin | Updated: October 24, 2014 01:05 IST2014-10-24T00:59:16+5:302014-10-24T01:05:12+5:30
उपनगरमधून बनावट खवा जप्त

उपनगरमधून बनावट खवा जप्त
इंदिरानगर : गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक तीनने सुमारे ७0 हजार रुपयांचा ३४0 किलोचा बनावट खवा जप्त केला, तसेच एक संशयिताला अटक केली आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.
गुन्हे शाखा युनिट-३ चे हवालदार जाकीर शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक संजय सानप, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांच्या नेतृत्वाखाली सुभाष गुंजाळ, गंगाधर केदार, आत्माराम रेवगडे, विलास गांगुर्डे, रमीज शेख, शांताराम महाले, संदीप भाबड, मोहन देशमुख, संतोष कोरडे व अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, प्रदीप कुटे यांनी संयुक्तरीत्या संशयित राधेश्याम रामबिहारी पाल (रा. शिवरामनगर, टाकळीरोड, उपनगर) यांच्या राहत्या घरी धाड टाकली. त्यावेळी ११ नकली खव्याच्या गोण्या व सुटा असा एकूण सुमारे ७0 हजार रुपयांचा ३४0 किलो नकली खवा मंगळवारी जप्त करण्यात आला.
संशयित आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यामुळे ऐन दिवाळी बाजारात नकली खव्यामुळे होणारी दुर्घटना टळली आहे. (वार्ताहर)