अटकपूर्व जामिनासाठी बनावट प्रमाणपत्र

By Admin | Updated: March 30, 2015 00:17 IST2015-03-30T00:17:21+5:302015-03-30T00:17:41+5:30

संशयित फरार : पंचवटीत तिघांवर गुन्हा दाखल

Fake certificate for anticipatory bail | अटकपूर्व जामिनासाठी बनावट प्रमाणपत्र

अटकपूर्व जामिनासाठी बनावट प्रमाणपत्र

नाशिक : अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणात तिघा संशयितांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी दिलेले तहसीलदारांचे सॉलव्हन्सी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हे तिघेही संशयित फरार आहेत़
पंचवटी पोलीस ठाणे परिसरात मार्चमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणात पंचवटी पोलिसांनी दीपक जाधव यास अटक केली होती, तर उर्वरित तिघे संशयित राजेंद्र जाधव, अलका जाधव, संतोष खर्डे या तिघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता़ न्यायालयाच्या आदेशानुसार किरण रमेश सोनवणे यास जामीनदार म्हणून हजर केले़ तसेच न्यायालयात आवश्यक असलेले निवासी नायब तहसीलदारांचे सॉलव्हन्सी प्रमाणपत्र सादर केले होते़ मात्र, हे प्रमाणपत्र बनावट तसेच यावर तहसीलदारांची स्वाक्षरी तसेच शिक्काही बनावट असल्याचे तपासात आढळून आले़
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित राजेंद्र जाधव, अलका जाधव, संतोष खर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे तिघेही फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Fake certificate for anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.