मेळा स्थानक; समस्यांचे आगर

By Admin | Updated: December 2, 2015 22:14 IST2015-12-02T22:13:36+5:302015-12-02T22:14:28+5:30

मेळा स्थानक; समस्यांचे आगर

Fair Stations; Problems? | मेळा स्थानक; समस्यांचे आगर

मेळा स्थानक; समस्यांचे आगर

नाशिक : मेळा बसस्थानकाचे नूतनीकरण होण्याचे वारंवार सांगितले जात असले तरी दिवसेंदिवस समस्येच्या गर्तेत अडकणाऱ्या या स्थानकाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे.
शहरातील सर्वांत जुने स्थानक म्हणून मेळा बसस्थानक ओळखले जाते. पूर्वी याच स्थानकातून शहरासाठी आणि बाहेरगावच्याही गाड्या सोडल्या जात होत्या. परंतु पर्यायी बसस्थानके निर्माण झाल्यानंतर या स्थानकाकडे एस.टी. महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. स्थानकाच्या बाजूला प्रचंड कचरा पडलेला आहे. त्यातच जवळच स्वच्छतागृह असल्याने तेथील फुटलेल्या पाइपलाइनचे पाणी कचऱ्याभोवती जमा होते. त्यातून आणखीच दुर्गंधी पसरते. स्थानकात प्रवेश केल्यानंतर लगेच या कचऱ्याचे दर्शन होते. दुसऱ्या बाजूला झाडांची सावली असलेल्या ठिकाणी बसण्यासाठी सीमेंट कॉँक्रीटचे कठडे तयार करण्यात आले होते. हे कठडे आता पूर्णपणे तुटलेले आहेत. झाडाभोवती असलेल्या सीमेंट कॉँक्रीटचा ओटादेखील तुटल्याने प्रवाशांना सावलीत बसता येत नाही. या ठिकाणचा ताबा मद्यपी आणि गर्दुल्यांनी घेतल्याने प्रवाशांना येथे थांबणेही मुश्कील झाले आहे. पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने टवाळखोरांनी येथे अड्डा बनविला आहे.
अलीकडे तर अनेक नोकरदारवर्ग बसस्थानकाच्या आवारात आपल्या दुचाकी उभ्या करून निघून जातात. यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पिण्याच्या पाण्याचीदेखील पुरेशी सोय या ठिकाणी नाही. असलेल्या पाणपोईचीदेखील दुरवस्था झालेली आहे.

Web Title: Fair Stations; Problems?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.