सातपूरला मतदान यंत्रात बिघाड
By Admin | Updated: October 16, 2014 19:01 IST2014-10-15T22:58:17+5:302014-10-16T19:01:45+5:30
सातपूरला मतदान यंत्रात बिघाड

सातपूरला मतदान यंत्रात बिघाड
सातपूर : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सातपूर येथील महापालिकेच्या जिजामाता शाळेतील मतदान केंद्र क्रमांक १४२ मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याने जवळपास एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती.
सकाळी ८ वाजेच्या सुमारास मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात आले. याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी वरिष्ठांना लगेच खबर दिल्यानंतर ताबडतोब नवीन मतदान यंत्र कार्यान्वित करण्यात आले. या प्रक्रियेसाठी एक तासाचा कालावधी लागला. बिघाड झालेल्या यंत्रात ४२ मतदान झाले होते.
केंद्राध्यक्षांनी सदर यंत्र पंचासमक्ष सीलबंद करून ते बाजूला ठेवले आणि नवीन मतदान यंत्र बसविल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत झाली. मतदान यंत्रात बिघाड झाला त्यावेळी केंद्रात मतदारांची फारशी गर्दी नसल्याने मतदारांनीही प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सहकार्य केले. (वार्ताहर)