नागरी सेवा केंद्रावर ‘आधार’ची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:21 IST2017-08-23T23:41:08+5:302017-08-24T00:21:08+5:30
सर्वाेच्च न्यायालयाने आधार कार्ड व त्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार यापुढे शासकीय देखरेखीखाली आधार केंद्र चालविले जाणार असून, त्यासाठी नाशिक शहरात महापालिकेच्या १६ नागरी सुविधा केंद्रांवर येत्या दोन दिवसांपासून आधार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मंडळ अधिकाºयांच्या कार्यालयात या केंद्रांचे कामकाज चालणार आहे.

नागरी सेवा केंद्रावर ‘आधार’ची सोय
नाशिक : सर्वाेच्च न्यायालयाने आधार कार्ड व त्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार यापुढे शासकीय देखरेखीखाली आधार केंद्र चालविले जाणार असून, त्यासाठी नाशिक शहरात महापालिकेच्या १६ नागरी सुविधा केंद्रांवर येत्या दोन दिवसांपासून आधार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मंडळ अधिकाºयांच्या कार्यालयात या केंद्रांचे कामकाज चालणार आहे. शासनाने आधार केंद्रे चालविण्याचे काम काही शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कंपन्यांनाही दिले होते. त्यासाठी बेसिक या कंपनीच्या माध्यमातून आधार कार्ड काढून देण्याचा करार शासनाने केला होता. डिसेंबर महिन्यात शासनाचा व कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर शासकीय आधार केंद्रे बंद पडली होती. शासनाने महा आॅनलाइनच्या माध्यमातून बंद पडलेल्या आधार यंत्राचे अद्यावतीकरण करण्यास सुरुवात केली. परंत ही प्रक्रिया अतिशय संथ असल्याने व त्यातच शासनाने सर्वच शासकीय योजना व सोयी, सवलतींसाठी आधार अनिवार्य केल्याने नागरिकांची आधार कार्ड काढण्यासाठी हेळसांड होऊ लागली होती. नाशिक महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये सोळा ठिकाणी येत्या दोन दिवसांत ही केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. या आधार केंद्रांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या त्या विभागीय अधिकाºयांवर निश्चित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही आधारची सुविधा नसल्याची बाब लक्षात घेऊन मंडळ अधिकाºयांच्या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जी यंत्रे सध्या अस्तित्वात आहे त्यांचे वाटप करण्यात येईल. मंडळ अधिकाºयांनी आधार केंद्रावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या बंद असलेली यंत्रे शासनाकडून ज्या प्रमाणात अद्ययावत करण्यात येतील त्या प्रमाणात आधार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
७० आधार केंद्रे तत्काळ कार्यान्वित
नाशिक जिल्ह्यात शासकीय १४० आधार यंत्रे असल्याने यातील निम्म्याच यंत्रांचे अद्ययावतीकरण आजपावेतो झाले आहे. नागरिकांची गरज ओळखून ७० केंद्रे तत्काळ कार्यान्वित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासाने घेतला आहे. तत्पूर्वी शासनाने आधार केंद्रे शासकीय कार्यालयात बसविण्याचे निर्देश यंत्रणेला दिल्यामुळे आता शाळा, समाजमंदिरांमध्ये सुरू असलेली आधार केंद्रे शासकीय कार्यालयांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत.
सोळा ठिकाणी व्यवस्था
नाशिक महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये सोळा ठिकाणी येत्या दोन दिवसांत ही केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. या आधार केंद्रांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या त्या विभागीय अधिकाºयांवर निश्चित करण्यात येणार आहे.