ग्रामीण रु ग्णालयात सुविधांची वानवा

By Admin | Updated: May 17, 2016 00:07 IST2016-05-17T00:05:08+5:302016-05-17T00:07:08+5:30

पेठ : साहित्य नसल्याने रुग्णांचे हाल; ग्रामस्थांत नाराजी

Facilitating facilities in rural RU hospital | ग्रामीण रु ग्णालयात सुविधांची वानवा

ग्रामीण रु ग्णालयात सुविधांची वानवा

 पेठ : येथील ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव असून, रुग्णांना बेडशिटविनाच रुग्णांना बेडवर रहावे लागत असल्याने शहरातील संतापलेल्या तरुणांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहाडे यांची भेट घेऊन कैफियत मांडून निवेदन देण्यात आले असून, निवेदनाच्या प्रति जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य उपसंचालकांना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुविधांअभावी समस्यांचा सामना करावा लागत असून, येथील कर्मचारी
रुग्णांशी अरेरावीच्या करतात व मनमानीपणे रुग्णांशी वागतात. रविवारी रात्री शहरातील एका रु ग्णास ९.३०च्या दरम्यान दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील बेडवर बेडशिट नसल्याचे परिचारिकेच्या निदर्शनास आणले असता बेडशिट धुण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. त्यावर दुसरा बेडशिटचा संच कुठे गेला असे विचारताच तो रक्ताने भरलेला आहे. नंतर तो स्टोअर रूममध्ये आहे त्याची चावी नाही, अशी खोटी उत्तरे दिली. त्यामुळे रुग्णांना तशाच अवस्थेत रात्र काढावी लागली. सदर प्रकाराची चौकशी करून कायदेशीर कारवाईचे व त्यांच्या बदलीचे निवेदन वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहाडे यांना देण्यात आले.
निवेदनावर राजेंद्र कहाणे, अशुतोष महमाने, राकेश चौधरी, सुनील पवार, गणेश सोनार, राहुल व्यवहारे, निखिल कर्पे, मोन्टी सोनार, सौरभ गाडगीळ व शिवमुद्रा फ्रेण्ड सर्कल कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Facilitating facilities in rural RU hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.