शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या अंमलबजावणीत ड्रोनद्वारे नाशिक शहरावर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 14:40 IST

एका  खासगी टेक्नॉलॉजी संस्थेच्या टिमने शहरातील परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून शहरातील जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी सारख्या परिसरात पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी करणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवणार आहे. या ड्रोनला पब्लीक अ‍ॅड्रेसिंग सिंस्टम त्याद्वारे गर्दीच्या ठिकाणी संचारबंदीच्या अंमलबजावणीविषयी माहितीही देणार आहेत.

ठळक मुद्देसंचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी ड्रोनचा वापर आठ ड्रोन कॅमेरे ठेवणार नाशिक शहरावर नजर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची माहिती

नाशिक : कोरोना वायरसचा फैलाव रोखण्यासाठी  देशभरात संचारबंदीचे आदेश लागू असतानाही जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी परिसरात अनेक नागरिक  घराबाहेर पडून विनाकारण रस्त्यावर व चौकात गर्दी करीत आहेत. अशा परिसरावर नजर ठेवून नियंत्रण राखण्यासाठी  नाशिक शहर पोलीस ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने संपूर्ण शहरावर नजर ठेवणार आहे. त्याचप्रमाणे अशा ठिकाणी गर्दी करणाऱ्या नागरिकांना संचारबंदीविषयी सुचना करून त्यांच्यावर कारावाईही करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस आयुक्त विशवास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी (दि.२७) माध्यमांशी बोलताना दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात लागू असलेल्या संचारबंदीरम्यान शहरातील परिस्थीतीविषयी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका  खासगी टेक्नॉलॉजी संस्थेच्या टिमने शहरातील परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून शहरातील जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी सारख्या परिसरात पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी करणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवणार आहे. या ड्रोनला पब्लीक अ‍ॅड्रेसिंग सिंस्टम त्याद्वारे गर्दीच्या ठिकाणी संचारबंदीच्या अंमलबजावणीविषयी माहितीही देणार आहेत. त्यानंतरही संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या शहरात ८६ पॉईंटवर नाकाबंदी करण्यात आली असून केवळ अत्यावश्यक आरोग्यसेवा व जीवनावश्यक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगणी देण्यात आल्याचेही पोलीस  आयुक्तांनी सांगितले. 

आठ कॅमेरे, ६५ बीट मार्शल रस्त्यावरसंचार बंदीच्या परिस्थितीत शहरातील विविध भागावर नजर ठेवण्यासाठी शहर पोलीसांना खासगी संस्थेच्या पुढाकारातून ८ ड्रोन कॅमेरे मिळणार असून टप्प्या टप्प्याने श्हरातील सर्व १३ पोलीस ठाण्यांनाही प्रत्येकी एक याप्रमाणे १३ ड्रोन कॅमेरे उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे शहरात सुमारे ६५ बीट मार्शल व गस्तीपथकांची १६ चारचाकी वाहनेही परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नाशिक शहराची पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली असून त्यासाठी ८६ पॉईंटवर पोलीस तैनात करण्यात अल्याची माहिती पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील यांनी दिली  आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणेVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील