शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडमार्गेअवजड वाहनांची सर्रास वाहतूक ; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:28 IST

जेलरोडमार्गे अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एक वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे अपघातात एक वृद्धाचा मृत्यू जेलरोड मार्गावरून जड वाहनांना वाहतुकीस बंदीसर्रासपणे दिवस-रात्र जड वाहनांची वाहतूक

नाशिकरोड : जेलरोडमार्गे अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एक वृद्धाचा मृत्यू झाला आहे.  जेलरोडवर अनेक शाळा तसेच सरकारी मुद्रणालय असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थी व कामगारांची मोठी वर्दळ असते. तसेच जेलरोड मार्ग हा औरंगाबाद व पुणे महामार्गाला जोडला गेला असल्याने बाहेरगावच्या वाहनांची येथे सारखी ये-जा असते. यापूर्वीही येथे अनेक अपघात झाल्याने जेलरोड मार्गावरून जड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.  इंगळेनगर, जेलटाकी व सैलानीबाबा दर्गा चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल बसविण्याची मागणी यापूर्वीच अनेक राजकीय पक्षांनी केली आहे. मात्र सदर मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. जेलरोड परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वसली असून, त्या रहिवाशांची परिसरात सतत रेलचेल असते.  जेलरोडमार्गे जड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्रासपणे दिवस-रात्र जड वाहनांची वाहतूक सुरू असते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, सतत अपघात होण्यासारखी स्थिती असते. बिटको चौक, नांदूरनाका येथे वाहतूक शाखेने जेलरोडला जेथून सुरुवात होते तेथे ‘जड वाहतुकीस बंदी’ असा फलक लावणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांची आवश्यकता जेलरोडवर असलेली शाळा-महाविद्यालये, मुद्रणालय ते दुपारी एकाचवेळी सुटतात व भरतात. सायंकाळीदेखील हीच स्थिती असते. यावेळी विद्यार्थी, कामगार यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे यावेळेला वाहतूक सुरळीत राहण्यासाठी बिटको ते जेलटाकीपर्यंत वाहतूक पोलिसांची नेमणूक होणे व तेथे रस्त्यावर भरणारा भाजीबाजार हटविणे गरजेचे आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस