अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
By Admin | Updated: August 21, 2016 22:57 IST2016-08-21T22:57:23+5:302016-08-21T22:57:58+5:30
मंगरूळ : पंचनामे करण्याची मागणी चांदवड

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
चांदवड : तालुक्यातील मंगरूळ, भरवीर, देवगाव, शिवाजीनगर, तळवाडे, चिंचोले या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे मका, भुईमूग, कांदा रोप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांचे मका, भुईमूग आदि पिकांचा पंतप्रधान पीक विमा उतरविलेला आहे.
चांदवडच्या तहसीलदारांकडे याबाबत निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याची खंत जाधव यांनी प्रांताधिकारी यांच्या नजरेस आणून दिली. या शिष्टमंडळात यादव जाधव, संपत देशमाने, रघुनाथ जाधव, योगेश ढोमसे, विजय धाकराव, चंद्रशील मते, अंकुश रायते आदिंसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)