गृहरक्षक दलातील जवानांना जादा काम

By Admin | Updated: May 29, 2016 22:54 IST2016-05-29T22:53:49+5:302016-05-29T22:54:33+5:30

मनोहर पर्रिकर : विविध समस्यांबाबत निवेदन

Extra work to the guards of the guards | गृहरक्षक दलातील जवानांना जादा काम

गृहरक्षक दलातील जवानांना जादा काम

 नाशिक : गृहरक्षक दलातील जवानांना केवळ सण, उत्सव, निवडणुका, परीक्षा यावेळी काम न देता वर्षातून किमान तीनशे दिवस काम कसे मिळेल यादृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासन देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गृहरक्षक दलातील जवानांना दिले़ सावरकर यांच्या वाड्याचे लोकार्पण सोहळ्यासाठी ते नाशिकमध्ये आले असता त्यांना गृहरक्षक दलाच्या जवानांनी विविध समस्यांबाबत निवेदन दिले़
जवानांनी पर्रिकर यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले़ त्यामध्ये प्रमुख मागणी ही वर्षातून किमान तीनशे दिवस काम मिळावे, अशी होती़ या मागणीबाबत पर्रिकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन गृहरक्षक दलाच्या जवानांना दिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Extra work to the guards of the guards