आरम नदीपात्रातून सर्रास वाळू चोरी

By Admin | Updated: May 30, 2014 01:31 IST2014-05-30T01:28:53+5:302014-05-30T01:31:09+5:30

मुंजवाड / लोहणेर : मुंजवाड आणि लोहणेर येथे नदीपात्रातून अवैद्यरीत्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत. याबाबत शासनस्तरावर कार्यवाही होन नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Extra ordinary sand from the river Aram | आरम नदीपात्रातून सर्रास वाळू चोरी

आरम नदीपात्रातून सर्रास वाळू चोरी

मुंजवाड / लोहणेर : मुंजवाड आणि लोहणेर येथे नदीपात्रातून अवैद्यरीत्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत. याबाबत शासनस्तरावर कार्यवाही होन नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मुंजवाड- केळझर धरणाचे तिसरे आवर्तन संपताच आरम नदीपात्रातून वाळू उपसाचे सत्र सुरू असून, नदीकाठावरील गावातून बैलगाडीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहेत. गावाच्या गरजेपुरती ग्रामस्थांनी बैलगाडीने वाळू उपशासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन वाळू उपसा सुरू केला असला तरी याचा गैरफायदा घेऊन वाळूमाफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारीवरून दिसून येते. या गंभीर बाबीकडे महसूल खाते मात्र डोळेझाक करीत आहे. वाळू उपशामुळे आरम नदीपात्राजवळील विहिरी आवर्तन बंद होतात. तळ गाठायला सुरुवात करतात. यामुळे सटाण्यापासून डांगसौंदाणेपर्यंत आरम नदीवर असलेल्या गावांचा पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीही तळ गाठत असल्याने ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. वाळू उपशास ग्रामस्थांचा विरोध असला तरी वाळूमाफिया दांडगाई करून वाळू वाहतूक करीत असल्याने अनेक वेळा संघर्ष घडतो. लोहोणेर : लोहोणेर गावालगत वाहणार्‍या गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ट्रक्टरच्या सहाय्याने बेसुमार वाळू उपसा होत असून, यामुळे नदीपात्रातील मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे पाण्याची पातळी खालावली असून, या नदीवर अवलंबून असलेल्या पाणी योजनाही धोक्यात आलेल्या आहेत. या गावालगत गिरणा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू उपसा होत असून, या स्थानिक ट्रॅक्टरचालकासह मालकांसह बाहेरगावातील ट्रॅक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस नदीपात्रात यात्रेचे स्वरूप येत असून, बाहेरगावातील मजुरांची संख्या वाढते आहे. निर्ढावलेले वाळू तस्कर सकाळी उशिरापर्यंत वाळू उपसा करतात या संदर्भात शासकीय अधिकार्‍यांसह कोणीही कडक भूमिका घेत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Extra ordinary sand from the river Aram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.