नाशिक : भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसच्या तरतुदीनुसार देशातील सोन्याच्या दागिन्यांवर १ जून २०२१ पर्यंत हॉलमार्किंग अनिवार्य होणार करण्यासाठी दिलेली मुदत १६ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. हॉलमार्किंगसाठी मुदतवाढ मिळाल्याने सराफ व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता सराफ व्यावसायिकांना १६ जूनपर्यंत वेबसाईट हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विक्री करू शकणार आहेत.
हॉलमार्किंगसाठी मुदतवाढ मिळाल्यामुळे सोन्याचे दागिने विकणाऱ्या विक्रेत्यांना आता १६ जूननंतर दागिने विकताना हॉलमार्क असलेले दागिनेच विकावे लागणार आहे. विक्रेत्यांना १६ जून २०२१ पासून केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांचा हॉलमार्क असलेल्या वस्तू विकता येणार आहेत.परंतु , नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात २३ आणि २४ कॅरेट सोन्याला अधिक मागणी असून याच श्रेणीत मोठ्या प्रमाणात व्यावहार होत असल्याने व्यापारी संघटनांनी या श्रेणीतही हॉलमार्कींसह व्यावहार करण्यास परवानगी मिळण्याची मागणी केली आहे.
भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आणि हॉलमार्किंगची व्यवस्था करण्यासाठी विक्रेत्यांना एका वर्षाची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार १५ जानेवारी २०२१ पासून सोन्यांच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक येणार होते. परंतु कोरोना संकटामुळे व व्यावसायिकांच्या अडचणी लाखात घेऊन हॉल मार्किंगसाठी मुदत वाढ दोण्यात आली होती. ही मुदत १ जूनला संपुष्टात आल्यानंतर आता पुन्हा १६ जूनपर्यंत मुदत वाढ मिळाल्याने सराफ व्यावसायिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
कोटहॉलमार्कचे स्वागतच
ग्राहक आणि सराफ यांच्यात पारदर्शकता येण्यासाठी हॉलमार्क आवश्यक आहे. सध्या १४, १८ व २२ कॅरेट दागिन्यांना हॉलमार्क सक्तीचे आहे. त्याचबरोबर २१, २३ आणि २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांनाही हॉलमार्कसाठी मान्यता मिळावी, त्याचबरोबर हॉलमार्क सेंटरची संख्या पण वाढविण्याची आवश्यकता आहे.
- गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन
===Photopath===
060621\515906nsk_36_06062021_13.jpg
===Caption===
गिरीश नवसे