शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 10:07 PM

नाशिक : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून, यापूर्वी २१ आॅगस्टपर्यंत असलेली ‘आयटीआय’ प्रवेशाच्या अर्जाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे५ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी : ९ ते १४ सप्टेंबरदरम्यान प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून, यापूर्वी २१ आॅगस्टपर्यंत असलेली ‘आयटीआय’ प्रवेशाच्या अर्जाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी अर्ज नोंदविता न आल्याने मुदतवाढ देण्यात आली असून, ५ सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. जे विद्यार्थी अर्जासोबत प्रवेश अर्जाचे शुल्क भरतील त्यांचेच अर्ज पुढील प्रवेशप्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या या प्रवेशप्रक्रियेचे दुसऱ्यांदा वेळापत्रक बदलण्यात आले आहे. दहावी च्या निकालानंतर गेल्या आठवड्यात गुणपत्रिकेचे वाटप सुरु झाले. अनेक विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्याने त्यांना अर्ज नोंदणीत अडचणी आल्या. काही विद्यार्थ्यांना तांत्रिक समस्येमुळे अर्ज नोंदवता आले नाहीत. त्यामुळे २१ आॅगस्टनंतर पुन्हा दहा दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जाणार नाही, याबाबत नियोजन सुरु असून यानंतर शक्यतो मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पहिल्या वेळापत्रकानुसार २० आॅगस्ट रोजी प्रवेशाची पहिली फेरी होणार होती. मात्र, दोन वेळेस प्रवेश प्रक्रियेत बदल झाल्याने अठरा दिवसांनी प्रवेश प्रक्रिया पुढे सरकली आहे. त्यानंतर ८ सप्टेंबरला पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाया निहाय निवड यादी संकेस्थळावर प्रसिद्ध करून संबंधित उमेदवारांना एसएमएस द्वारे कळविण्यात येणार असून ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित केले जाणार आहे. बदल करण्याची संधीआयटीआय प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार दि.३ सप्टेंबर प्राथमिक गुणवत्ता यादी (सकाळी ११ वाजता) प्रसिद्ध होणार असून, ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना त्यावर हरकती नोंदविण्याची तसेच माहितीत बदल करण्याची संधी मिळणार आहे. तर ५ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी (सायंकाळी ५ वाजता) घोषित होणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा