कलागुणांचे प्रस्ताव सादर कण्यास मूदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:44+5:302021-02-13T04:15:44+5:30

नाशिक : दहावीच्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला स्पर्धेत सहभागी झाल्यास अतिरिक्त गुण दिले ...

Extension for submission of artistic proposals | कलागुणांचे प्रस्ताव सादर कण्यास मूदतवाढ

कलागुणांचे प्रस्ताव सादर कण्यास मूदतवाढ

नाशिक : दहावीच्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला स्पर्धेत सहभागी झाल्यास अतिरिक्त गुण दिले जातात. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना २७ फेब्रुवारीपर्यंत शाळांकडे प्रस्ताव सादर करता येणार आहे. तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यास १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकलेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची तरतूद आहे. २४ नोव्हेंबर २०१७च्या शासन निर्णयानुसार हे गुण दिले जातात. त्याबाबतचा प्रस्ताव शाळेकडे सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर व शाळांनी विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, या कालावधीत अनेक विद्यार्थी प्रस्ताव सादर करू शकले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे.

Web Title: Extension for submission of artistic proposals