शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST2021-07-12T04:10:59+5:302021-07-12T04:10:59+5:30
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व ...

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना, तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, आदी योजनेचे शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी ‘महा-डीबीटी’ पोर्टल ३ डिसेंबर, २०२० पासून कार्यान्वित झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच प्रलंबित असलेले पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून तत्काळ संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे लॉगिन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.