आधार कार्ड केंद्र वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST2020-12-11T04:41:47+5:302020-12-11T04:41:47+5:30

नासर्डी ते पाथर्डी दरम्यान विविध उपनगरे आहेत. पाथर्डी फाटा परिसरात ज्ञानेश्वर नगर, संत नरहरी नगर, दामोदर नगर, प्रशांत नगर, ...

Extend Aadhar Card Center | आधार कार्ड केंद्र वाढवा

आधार कार्ड केंद्र वाढवा

नासर्डी ते पाथर्डी दरम्यान विविध उपनगरे आहेत. पाथर्डी फाटा परिसरात ज्ञानेश्वर नगर, संत नरहरी नगर, दामोदर नगर, प्रशांत नगर, वासन नगर, पाथर्डी गाव सह विविध उपनगरे आहेत. यामध्ये दिवसागणिक अपार्टमेंट व सोसायट्या वाढत आहेत. लोकवस्तीच्या मानाने परिसरात दोन आधार कार्ड केंद्र आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला आता आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी किंवा लिंक करण्यासाठी प्रत्येकाला आधार कार्ड केंद्रावर ये-जा करावी लागते. त्यासाठी पाथर्डीगाव, सिडको किंवा शहरात ये-जा करावी लागते यामुळे परिसरातील नागरिकांना वेळ व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी जाऊन सुद्धा लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

Web Title: Extend Aadhar Card Center