मनपा प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त
By Admin | Updated: October 6, 2014 00:22 IST2014-10-06T00:22:40+5:302014-10-06T00:22:40+5:30
मनपा प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त

मनपा प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त
मालेगाव : येथील महानगरपालिका प्रशासनाने ऐन दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर येथील चंदनपुरी गेट ते मरीमाता मंदिर व दसरा मैदानपर्यंतच्या रस्त्याचे नूतनीकरण तर सोडा साधी डागडुजीदेखील केली नाही. त्यामुळे मनपा प्रशासन सण-उत्सवाबाबत दुजाभाव करत असल्याचे स्पष्ट झाले असून दसरा मैदानावर रावणदहनासाठी उपस्थित नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला गेला. दरम्यान, वर्षभरापासून यासंदर्भात पत्रव्यवहार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपा प्रशासनाचा या भागातील मरीमाता विजय मंडळाने निषेध केला आहे. शुक्रवारी शहरात विजयादशमी अर्थात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पारंपरिकरीत्या येथील विजयादशमी समितीतर्फे झांजेश्वरलगत मोसमनदी काठावर रावणाचे दहन करण्यात आले. त्यासाठी पारंपरिकरीत्या शहरातून मिरवणूक काढण्यात आली.