शेणीत येथील शेतात स्फोटक
By Admin | Updated: June 9, 2014 00:32 IST2014-06-09T00:27:14+5:302014-06-09T00:32:54+5:30
घबराट : नांगरताना आढळली वस्तू

शेणीत येथील शेतात स्फोटक
घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे आज दुपारच्या सुमारच्या सुमारास एक शेतकरी शेताची नांगरणी करीत असताना शेतात बॉम्बसदृश संशियत वस्तू आढळून आल्याने परिसरात घबराट पसरली. सदर बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली. अखेर नाशिक व मालेगाव येथून पोलिसांनी मागविलेल्या बॉम्बशोधक पथकाने हे स्फोटक निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
संदीप तुकाराम कुंडारिया यांची शेणीत फाटा येथे विडलोपार्जित शेतजमीन असून, ही जमीन गेली अनेक वर्षांपासून पडित आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास संदीप कुंडारिया ही जमीन नांगरत असताना त्यांच्या नांगराला एक धातूची बॉम्ब सदृश वस्तू लागून जमिनीच्या वर आली.या संशियत स्फोटकातून प्रथम धूर येऊ लागला. नंतर या वस्तुने पेट घेतला.यामुळे भयभीत झालेल्या संदीप याने येथून पळ काढीत या बाबीची कल्पना ग्रामस्थांना दिली.व हा प्रकार वाडीवऱ्हे पोलिसांना कळविला. दरम्यान पोलिसांनी नाशिक व मालेगाव येथील बॉम्ब नाशक व तपासणी पथकाला तातडीने पाचारण करीत या पथकाने ही बॉम्ब सदृश वस्तू निकामी केली.यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, या ठिकाणापासून देवळाली येथील तोफखाना सराव केंद्र हाकेच्या अंतरावर असल्याने लष्करांनी सराव केल्यानंतर स्फोटकांचे काही तुकडे या भागातील शेतात पडतात.यातील काही स्फोटकांचा अखेरपर्यंत स्फोट होत नसल्याने ही दारूगोळ्याची जिवंत स्फोटके शेतात पडतात. (वार्ताहर)