कंपनीत टाकीचा स्फोट; कर्मचारी ठार

By Admin | Updated: June 10, 2014 00:38 IST2014-06-10T00:22:04+5:302014-06-10T00:38:36+5:30

वाडीवऱ्हे येथील औद्योगिक वसाहतीतील घटना

The explosion of a tank in the company; Employee killed | कंपनीत टाकीचा स्फोट; कर्मचारी ठार

कंपनीत टाकीचा स्फोट; कर्मचारी ठार

 

नाशिक : वाडीवऱ्हे येथील कंपनीत काम करत असताना लोखंडी टाकीमध्ये स्फोट होऊन उडालेल्या टाकीच्या झाकणाचा मार डोक्यास लागल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली़
या अपघातात कामठवाडा येथील जाधव संकुलमध्ये राहणारे कर्मचारी श्याम काशीनाथ सदावर्ते (४४) यांचा मृत्यू झाला़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडीवऱ्हे येथील स्पॅसिलिटी केमिकल लिमिटेड या कंपनीत दुपारी १२ वाजता केमिकलच्या लोखंडी टाक्या हलविण्याचे काम सुरू होते़ १६ हजार लिटर क्षमतेची केमिकलची जुनी टाकी क्रेनच्या सहाय्याने हलवली जात असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस तयार होऊन छोटा स्फोट झाला़ (पान ५ वर)

यामुळे टाकीचे झाकण जोरात उडून समोर काम करत असलेले सदावर्ते यांच्या डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता़ याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक एऩ ए़ सय्यद तपास करीत आहेत़
दरम्यान,वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत सलग तिसऱ्या दिवशी स्फोटाची घटना घडली. यापूर्वी गौळाणे परिसरात स्फोटाच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यातील एका घटनेत बॉम्बसदृश्य वस्तूचा स्फोट होऊन दोन शेत मजूर गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या घटनेत शेतात नांगरणी सुरू असतांना ट्रॅक्टरच्या नांगराला बॉम्ब सदृश्यवस्तू लागून त्याचा स्फोट झाला होता.
 
सुरक्षा निरीक्षकांची भेट
कंपनीतील छोटा स्फ ोट व अपघात होऊन कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्यूची माहिती कळताच औद्योगिक सुरक्षा निरीक्षकांनी तत्काळ स्पॅसिलिटी केमिकल लिमिटेड कंपनीला भेट देऊन पाहणी केली़ त्यांनी कंपनीतील अपघाताबरोबरच इतर ठिकाणच्या सुरक्षिततेबाबत तपासणी केली.या अपघाताबाबत कंपनीवर काय कारवाई केली जाईल याचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाणार आहे़

Web Title: The explosion of a tank in the company; Employee killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.