तिबेटियन मार्केटमध्ये गॅस गळतीमुळेच स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:10 IST2017-10-09T00:10:11+5:302017-10-09T00:10:17+5:30
नाशिक : शरणपूररोडवरील तिबेटियन मार्केटमधील हॉटेलच्या गाळ्यात झालेला स्फोट हा गॅस गळतीतून झाल्याचा अहवाल पुणे येथील एनडीआरएफने दिला आहे़ त्यामुळे या स्फोटाबाबतचे गूढ संपल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी सांगितले़ शनिवारी (दि़७) पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास स्फोटाची घटना घडली होती़

तिबेटियन मार्केटमध्ये गॅस गळतीमुळेच स्फोट
नाशिक : शरणपूररोडवरील तिबेटियन मार्केटमधील हॉटेलच्या गाळ्यात झालेला स्फोट हा गॅस गळतीतून झाल्याचा अहवाल पुणे येथील एनडीआरएफने दिला आहे़ त्यामुळे या स्फोटाबाबतचे गूढ संपल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी सांगितले़ शनिवारी (दि़७) पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास स्फोटाची घटना घडली होती़
पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तिबेटियन मार्के टच्या पश्चिमेकडील एका गाळ्यात झालेल्या स्फोटात नऊ गाळे व चायनीज गाड्यांचे नुकसान झाले होते़ शहरातील गुन्हेगारीचे केंद्र असलेल्या या ठिकाणी स्फोटाची घटना घडल्याने पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ तसेच पुणे येथील एनडीआरएफच्या पथकास तपासणीसाठी बोलावले होते़ या तपासी यंत्रणांना या ठिकाणी स्फोटक पदार्थ आढळून न आल्याने शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या़
दरम्यान, एनडीआरएफ, फॉरेन्सिक एक्सपर्ट व बीडीडीएस यांनी केलेली पाहणी व निष्कर्ष तसेच पुण्यातील सूक्ष्म तपासणीनंतर दिलेला अहवाल यावरून गॅस गळतीतून हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे़पुणे येथील एनडीआरएफच्या पथकाने दिलेल्या अहवालातून तिबेटियन मार्केटमधील गाळ्यामध्ये झालेला स्फोट हा गॅस गळतीतून झाल्याचे समोर आले आहे़ पुणे येथील पथक माघारी गेले असून यामागे घातपाताची शक्यता नाही़
- डॉ. राजू भुजबळ, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक