हरसूल येथे आढळली मुदतबाह्य औषधे
By Admin | Updated: July 19, 2014 20:35 IST2014-07-18T22:24:36+5:302014-07-19T20:35:07+5:30
हरसूल येथे आढळली मुदतबाह्य औषधे

हरसूल येथे आढळली मुदतबाह्य औषधे
हरसूल : येथील टॅक्सी स्टॅण्डजवळ मुदतबाह्य झालेली मायक्रो न्यूट्रिअट सप्लिमेंट ही शासकीय औषधे बेवारसपणे दुकानाच्या पाठीमागील बाजूस आढळली असून, संबंधित विभागप्रमुखांनी मात्र काणाडोळा कल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे मुदतबाह्य औषधे तेथे कशी आली. कुठल्या शासकीय विभागाचे ते औषधे आहे हे मात्र सायंकाळपर्यंत समजले नाही.
याबाबत हरसूल येथील ग्रामीण रुग्णालय, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ती औषधे आमच्या विभागातील नसून दुसऱ्या शासकीय विभागाची आहे असे सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हरसूल येथे सापडलेले ती औषधे कुठल्या शासकीय विभागाची आहे हे गूढ मात्र कायम आहे. सापडलेली औषधे ही गरोदर महिला, स्तनदा माता तसेच कुपोषित मुलांना दिली जातात असे समजले. त्यामुळे शासन कोट्यवधी रु पये खर्च करून कुपोषण मुक्त करण्यासाठी खर्च करत असताना लहान मुलांना टॉनिक म्हणून दिली जाणारी मोफत औषधे रस्त्याच्या कडेला मुदत संपली म्हणून फेकून दिली जात आहे. परंतु तिचा वापर केला जात नसल्याने शासनाच्या मूळ हेतूलाच मात्र हरताळ फासण्याचे काम कामचुकार कर्मचारी करत आहे. असे प्रकार वारंवार घडत असून सुद्धा त्याकडे वरिष्ठ मात्र डोळेझाक करत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात नेमकी कुठल्या विभागाची चूक झाली आहे याचा शोध वरिष्ठांनी घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. (वार्ताहर)