अनुभव शिक्षा समाज मेळावा उत्साहात
By Admin | Updated: June 10, 2016 22:46 IST2016-06-10T22:44:59+5:302016-06-10T22:46:19+5:30
अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट : सामाजिक कार्यासाठी कार्यशाळा

अनुभव शिक्षा समाज मेळावा उत्साहात
नाशिक : अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दि.५ जून रोजी भगूरजवळील लेस्ली सोहनी सेंटर येथे आयोजित अनुभव शिक्षा समाज मेळावा उत्साहात पार पडला. अभिव्यक्तीतर्फे उत्तर महाराष्ट्रातील सृजनशील युवांचे संघटन करून त्यांच्या सामाजिक आणि माध्यम विषयक क्षमता विकसित करण्याचे सातत्याने प्रयत्न केलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान वीस हजारांपेक्षा अधिक युवा हे सामाजिक बांधिलकी जपून गाव विकासाच्या निर्णय प्रक्रि येत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. या जुन्या अनुभवी युवा साथींनी आत्मसात केलेले ज्ञान कौशल्य नव्याने अनुभव शिक्षा प्रक्रि येस जोडल्या गेलेल्या नव्या युवा साथींना हस्तांतरित करावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक येथील ४० जुने साथी सहभागी झाले होते. त्यांची सद्यस्थिती, त्यांचे सामाजिक कामातील योगदान, भविष्यातील योजना याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळेस अभिव्यक्तीने तयार केलेली जुन्या साथींच्या फिल्मचे स्क्रिनिंगही करण्यात आले. अभिव्यक्तीचे कार्यक्र म प्रमुख भिला ठाकरे यांनी पी.पी.टी.द्वारे अभिव्यक्ती व अनुभव शिक्षा या उपक्रमांची माहिती दिली. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अनुभव शिक्षाचे महाराष्ट्र प्रमुख नितीन मते, प्रशांत पवार, दिनेश भंगाळे , शोभा पवार, दीपा खुर्द , नितीन मते, मनीषा वधवा, प्रमोद शिरोडे, भूषण मुळे, सुनील देशमुख, सायरा शेख, अपूर्वा खुर्द, स्वाती कोठावदे, ज्ञानेश उगले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)