वाढदिवसाला बाहेर जाणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST2021-08-28T04:17:58+5:302021-08-28T04:17:58+5:30

वणी : वाढदिवसाला बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात संशयितांनी दिंडोरीच्या शिवाजीनगरमध्ये घरफोडी करून, ३० हजार रुपये रोख व ...

Expensive to go out on a birthday | वाढदिवसाला बाहेर जाणे पडले महागात

वाढदिवसाला बाहेर जाणे पडले महागात

वणी : वाढदिवसाला बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात संशयितांनी दिंडोरीच्या शिवाजीनगरमध्ये घरफोडी करून, ३० हजार रुपये रोख व ३० हजार रुपयांचे सुवर्णालंकार असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी चार जणांविरोधात संगनमताने घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक दिलीपराव शिंदे (२६) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत शिवाजीनगर, आदिवासी संकुलाजवळ दिंडोरी येथे वास्तव्यास आहेत. परिचितांच्या वाढदिवसानिमित्त घरातील सदस्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. हीच संधी संशयितांनी साधत प्रतीक शिंदे यांच्या घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व शयनकक्षात असलेल्या कपाटाला लक्ष्य केले. कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करत असताना, कपाटातील रोख रक्कम व सुवर्णालंकार यांच्यावर संशयितांची नजर गेली ३० हजार रुपये रोख व ३० हजार रुपयांचे सुवर्णालंकार असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतलेल्या शिंदे यांना घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता, शयनकक्षातील रोख रक्कम व सुवर्णालंकार कपाटात नसल्याचे आढळून आले. त्यांनी त्वरित दिंडोरी पोलिसात धाव घेतली व घडलेला प्रकार कथन केला. दिंडोरी पोलिसांनी शिंदे यांचे तक्रारीवरून अज्ञात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Expensive to go out on a birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.