शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिटी उद्यानाला देखभालीअभावी बकालस्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:37 IST

: येथील सिटी उद्यानाला देखभालअभावी दिवसेंदिवस बकालस्वरूप प्राप्त होत चालले असून, तातडीने देखभाल करण्याची आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे.

इंदिरानगर : येथील सिटी उद्यानाला देखभालअभावी दिवसेंदिवस बकालस्वरूप प्राप्त होत चालले असून, तातडीने देखभाल करण्याची आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे. तसेच  सिटी उद्यानात केव्हा कात टाकणार आणि बालगोपाळांची गैरसोय दूर होणार? असा प्रश्न निर्माण नागरिकांना झाला आहे. इंदिरानगर परिसरात एकही मोठे उद्यान नसल्याने नागरिकांच्या मागणीनुसार सुमारे दहा वर्षांपूर्वी जॉगिंग ट्रॅकलगत उद्यानाची निर्मिती करण्यात आली. सुमारे सहा एकर जागेत सिटी उद्यान तयार करण्यात आले. त्यावेळी एम्पी थिएटर, लॉन्स, आकर्षक विद्युत दिवे आणि खेळणी तसेच पे खेळणीसुद्धा बसवण्यात आल्या. त्यामुळे इंदिरानगर, राजीवनगर, विनयनगर, साईनाथनगर यांसह शहरातील विविध उपनगरांतील बालगोपाळ घेऊन नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत असत. त्यामुळे नेहमीच उद्यान फुललेले असायचे. सुमारे दोन ते तीन वर्षेच सिटी उद्यान व्यवस्थित होते. त्यानंतर हळूहळू देखभालीअभावी दयनीय अवस्था होण्यास सुरु वात झाली. आज बऱ्याच ठिकाणी लॉन्स पाण्याअभावी वाळले असून काही खेळणी तुटलेल्या अवस्थेत पडून आहे. तसेच पे खेळणीसुद्धा बºयाच दिवसांपासून बंद असल्याने त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. आकर्षक लावलेले दिवे निखळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सिटी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यातच येथे टवाळखोर, प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. त्यामुळे बालगोपाळांच्या संख्येत घट होत झालेली दिसून येत आहे. शहरातील विविध उपनगरांपैकी सिटी उद्यान मोठे असून, त्याची दुरुस्ती  करून खेळणी बसविणे गरजेचे आहे.अनेक महिन्यांपासून कारंजा बंदउद्यानाची देखभालअभावी दिवसेंदिवस बकालस्वरूप प्राप्त होत चालले आहे. तातडीने देखभाल आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून कारंजाही बंद आहे. तसेच ठिकठिकाणी खाद्यपदार्थांचे पाऊच पडलेले असतात.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका