नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर बदलाची अपेक्षा

By Admin | Updated: November 19, 2015 22:35 IST2015-11-19T22:35:00+5:302015-11-19T22:35:35+5:30

देवळा : इमारतीवर ग्रामपालिकेचेच नाव

Expecting change after the creation of the Nagar Panchayat | नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर बदलाची अपेक्षा

नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर बदलाची अपेक्षा

देवळा : नगरपंचायतीची निर्मिती होऊन नऊ महिने उलटले असताना आणि आठवडाभरात नगराध्यक्षांची निवड होण्याची वेळ आली असताना देवळा नगरपंचायत इमारतीवर ‘देवळा ग्रामपालिका’ असेच नाव झळकत असून प्रशासनाच्या एवढ्या व्यस्त कामकाजाबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यापासून देवळ्याच्या तहसीलदार शर्मिला भोसले या नगरपंचायतीच्या प्रशासक म्हणून काम पाहत होत्या. त्यांच्या प्रशासकपदाच्या कारकीर्दीत नगरपंचायतीत जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यात सर्वसामान्यांना बांधकामाची परवानगी असो किंवा रस्त्यावरील बंद पडलेले पथदीप सुरू करण्यासाठी येणारा खर्च असो अशी अनेक उदाहरणे देता येतील.
गत सहा महिन्यांपासून नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा थकलेला वेतनप्रश्न दिवाळीआधी मार्गी न लागल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी कोरडीच गेली. प्रशासक म्हणून त्या वादग्रस्त ठरल्या. नगरपंचायत निवडणूक झाल्यावर शर्मिला भोसले यांच्या जागी तहसीलदार म्हणून कैलास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. सहा दिवसांपूर्वीच त्यांनी सूत्रे हाती घेतली. देवळा ग्रामपालिकेऐवजी देवळा नगरपंचायत असा नावात बदल झाला नाही तर इमारतीवर नाव ग्रामपालिकेचे व आत कारभार मात्र नगरपंचायतीचा अशी विसंगती निर्माण होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Expecting change after the creation of the Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.