शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

By Admin | Updated: March 18, 2015 23:38 IST2015-03-18T23:32:33+5:302015-03-18T23:38:05+5:30

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगा?

Expectations for farmers help | शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

नाशिक : राज्याचा अर्थसंकल्प काल (दि. १८) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. त्यात जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीसाठी काही विशेष अशी तरतूद केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठेंगाच दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी दिवसभर गारपिटीने जिल्ह्यातील द्राक्ष व कांदा पिकांसह रब्बीच्या गहू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामेही करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेले असले, तरी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनाच विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांना बोलविण्याची मागणी करीत त्यांचे वाहन अडविले होते. जिल्ह्णातील २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आणि ३५ हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या आर्थिक नुकसानभरपाईसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात काही ठोस तरतूद ठेवण्यात येईल, अशी जिल्ह्णातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगाच दाखविण्यात आल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Expectations for farmers help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.