दाभाडीला सभापतिपदाची अपेक्षा

By Admin | Updated: September 4, 2014 00:05 IST2014-09-03T22:11:32+5:302014-09-04T00:05:38+5:30

दाभाडीला सभापतिपदाची अपेक्षा

Expectation of Dabhadi's chairmanship | दाभाडीला सभापतिपदाची अपेक्षा

दाभाडीला सभापतिपदाची अपेक्षा


नीलेश शिंपी

दाभाडी
मालेगाव पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असताना मालेगावला तब्बल तीन पंचायत समिती सभापती देणाऱ्या दाभाडीला यावेळी पुन्हा शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. यशवंत मानकर यांच्या रूपाने पुन्हा संधी मिळेल का? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या सोडतीत मालेगाव पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले. दाभाडी पंचायत समिती गणातील शिवसेनेचे सदस्य अ‍ॅड. यशवंत शिवराम मानकर सभापतिपदासाठी दावेदार असून, परिसरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
मालेगाव पंचायत समितीवर शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांचे वर्चस्व आहे. पहिल्या अडीच वर्षासाठी वंदना पवार व अनिता अहिरे यांना अनुक्रमे सभापती, उपसभापति-पदाची संधी देण्यात आली. आरक्षण सोडतीत सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे दाभाडीकर जनतेला अ‍ॅड. यशवंत मानकर यांच्या रूपाने सभापतिपदाचे स्वप्न पडू लागले आहे.
यापूर्वी मालेगाव पंचायत समिती सभापतिपदावर तालुक्यातील दाभाडीचे अ‍ॅड. लक्ष्मण किसन निकम यांना प्रथम संधी मिळाली. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांच्या पत्नी सौ. रेणुकानानी निकम यांना सभापतिपद देण्यात आले. सात वर्षांनंतर त्यांचे पुत्र शशिकांत निकम यांना सभापतिपदाची संधी मिळाली. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर अ‍ॅड. यशवंत मानकर दाभाडी पंचायत समिती गणातून निवडून आले. त्यावेळी सभापतिपद
हे महिलांना देण्यात आल्यामुळे
अ‍ॅड. मानकरांना सभापतिपद मिळाले नाही.
आरक्षण सोडतीत सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे अ‍ॅड. यशवंत मानकर यांना आमदार दादा भुसे हे सभापतिपदाची सधी देतील, अशी चर्चा दाभाडी गणात होते आहे. अ‍ॅड. यशवंत मानकर यांनी दाभाडीचे सरपंचपद भूषविले आहे. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभवदेखील आहे.

Web Title: Expectation of Dabhadi's chairmanship