नूतनीकरणासाठी आरटीओची मुदतवाढ
By Admin | Updated: November 9, 2015 22:42 IST2015-11-09T22:42:07+5:302015-11-09T22:42:57+5:30
नूतनीकरणासाठी आरटीओची मुदतवाढ

नूतनीकरणासाठी आरटीओची मुदतवाढ
नाशिक : आॅटोरिक्षा परवाने रद्द अथवा व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षा परवानाधारकांना देय कर, पर्यावरण कर, परवाना विलंब शुल्क, सहमत शुल्क, परवाना नूतनीकरण शुल्क भरून आपले परवाने नूतनीकरण करण्यासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जे परवानाधारक परवान्यांचे नूतनीकरण दिलेल्या मुदतीत करणार नाहीत त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. तसेच परवाने मुदतबाह्य झाले असल्यास परवानाधारकांना नव्याने परवाने प्राप्त करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या लॉटरी ड्रॉ मध्ये अपात्र ठरविण्यात येईल.
परवान्याशिवाय प्रवाशांची वाहतूक करताना आढळल्यास अशा रिक्षांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे. (प्रतिनिधी)