फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच

By Admin | Updated: June 15, 2014 18:26 IST2014-06-15T00:52:55+5:302014-06-15T18:26:12+5:30

नाशिकरोड : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकात सुरू असलेली कामे मार्च अखेर पूर्ण करावीत, अशी सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाला केली.

Expansion of platform soon | फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच

फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच

 

नाशिकरोड : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकात सुरू असलेली कामे मार्च अखेर पूर्ण करावीत, अशी सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाला केली. यावेळी गोडसे यांनी रेल्वेस्थानकावर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी आज सकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर अधीक्षक एम. बी. सक्सेना, एस. डी. कीर्तीकर, रवींद्र अत्रे, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक बी. डी. इप्पर आदिंशी चर्चा करून माहिती घेतली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चौथ्या व पाचव्या प्लॅटफॉर्मचे काम सिन्नर फाट्याच्या दिशेने लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. सिन्नर फाट्याकडून प्रवेशद्वार देण्यात येणार असून, त्याठिकाणी तिकीटघराचीदेखील व्यवस्था केली जाणार आहे. रेल्वेस्थानकावरच प्रवाशांचा जादा भार पडू नये म्हणून ओढा व देवळाली कॅम्प येथेदेखील विविध सुविधा उपलब्ध करून रेल्वे थांबविण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेस्थानकात येण्यासाठी सुभाषरोड रेल्वे कॉलनी येथून येण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ व ४-५ येथे उतरण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून खासदार गोडसे यांना सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Expansion of platform soon