गोविंदनगर कॉर्नरचे विस्तारीकरण

By Admin | Updated: January 10, 2016 23:22 IST2016-01-10T23:22:19+5:302016-01-10T23:22:47+5:30

उपाययोजना : इंदिरानगर बोगद्यासमोरील मार्ग होणार प्रशस्त

Expansion of Govindganj Corner | गोविंदनगर कॉर्नरचे विस्तारीकरण

गोविंदनगर कॉर्नरचे विस्तारीकरण

इंदिरानगर : इंदिरानगर समोरील उड्डाणपुलाचा बोगदा बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सातत्याने जनआंदोलन होत असल्याने प्रशासनाने काहीप्रमाणात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून, गोविंदनगर कॉर्नरचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. यामुळे होणारी वाहतूक कोंडी टळणार असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.
इंदिरानगर बोगद्याजवळील समांतर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता अखेर मनपाने गोविंदनगरकडे जाणाऱ्या कॉर्नरचे विस्तारीकरण करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी पोलीस प्रशासनाने सकाळी अचानक सीमेंटचे बॅरिकेट््स टाकून इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणारा बोगदा बंद केला. या संदर्भातील कोणतीही पूर्वसूचना न देता आणि नागरिकांची मते न मागविता अचानक बोगदा बंद केल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात नागरिकांनी जनआंदोलन सुरू केले होते. अनेकविध मार्गाने प्रशासनाचा
निषेध करीत आंदोलन करण्यात
आले होते. यामध्ये राजकीय पक्षांबरोबरच नागरिकांचा सहभागदेखील महत्त्वाचा होता. मात्र मागण्यांंकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. (वार्ताहर)

Web Title: Expansion of Govindganj Corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.