नाशिकच्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश
By Admin | Updated: November 18, 2014 00:45 IST2014-11-18T00:45:24+5:302014-11-18T00:45:41+5:30
नाशिकच्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश

नाशिकच्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ताब्यातील ग्रामीण रस्ते देखभाल दुरुस्तीचे धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने सात सदस्यांची समिती गठीत केली असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता विष्णु पालवे यांचा समावेश आहे. यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना शासन आदेश पाठविण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, रस्ते विकास योजना २००१ ते २०१२ अंतर्गत राज्यात ग्रामीण मार्गांची अस्तित्वातील एकूण लांबी दोन लाख ३६ हजार ८९० किलोमीटर (इतर जिल्हा मार्ग ६१ हजार १५८.५६ किमी अधिक ग्रामीण मार्ग १ लाख ७५ हजार ७३१.४८ किमी) आहे. यापैकी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ९८ हजार ६३९ किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांचे कोअर नेटवर्क तयार करण्यात आले असून, या रस्त्यांवर योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रस्त्यांची कामे / देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात. कोअर नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या व उर्वरित ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत धोरण तयार करण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत राज्याचे धोरण आखण्यासाठी राज्य शासनाने सात सदस्यीय समितीचे गठण केले