सीआरएएस युवा शाखेची कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:06 IST2020-11-02T21:55:17+5:302020-11-03T00:06:17+5:30
मनमाड : येथील रेल्वे कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखेची युवा कार्यकारिणी निवडणूक पद्धतीने घोषित करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया चेअरमन प्रकाश बोडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

मनमाड रेल्वे कारखान्यात सीआरएमएस युवा शाखेचे विजयी पदाधिकारी.
मनमाड : येथील रेल्वे कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखेची युवा कार्यकारिणी निवडणूक पद्धतीने घोषित करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया चेअरमन प्रकाश बोडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
याप्रसंगी सेक्रेटरी नितीन डी. पवार, वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल, एकनाथ पाटील यांनी संघटनेचे महत्त्व व समाजिक क्षेत्रात काम करण्याची संघटनेची ही पहिली पायरी असल्याचे सांगितले. निवडणुकीत युवा चेअरमन म्हणून वैभव कापडे, सचिव सोमनाथ सणस, खजिनदार - मुक्तार शेख, सहखजिनदार - शंकर कुंदे, व्हाइस चेअरमन- दीपक बोरसे, रमेश सिन्ना, वाल्मीक बाविस्कर, ज्ञानेश्वर बोडके, गफ्फार सय्यद, सहसचिव जयवंत बोरसे, इच्छाराम माळी, अमोल खाडे, किरण जाधव, इकबाल खान, युवा संघटक ज्ञानेश्वर आहेर, हेमंत माळी, पंकज मोकळ, संतोष पवार, मीडिया सेलप्रमुख विशाल महाजन, कॅन्टिग कमिटी मेंबर शंकर तात्याबा सांगळे, बाळू आहेर यांची निवड करण्यात आली.
यावेळी संघाचे गौतम वाघ, बलराज तगारे, अजहर तांबोळी, चिंधू सांगळे, गणेश हाडपे आदी उपस्थित होते.